Home क्राईम गोपाळपूरा येथून दोन शेळ्या व बोकडाची चोरी

गोपाळपूरा येथून दोन शेळ्या व बोकडाची चोरी

0
54


जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोपाळपुरा येथे घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड असे १६ हजार ५०० रुपयांचे पशुधन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोपालपूरा येथील भोलेनाथ मंदिर पुलाजवळ गं.भा. शीला नागराज सपकाळे वय ४० ह्या वास्तव्यास आहेत. मोलकरीण म्हणुन काम करून त्या उदरनिर्वाह भागवतात. १९ डिसेंबर रोजी रात्री शीला सपकाळे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या व बोकड घराजवळ बांधले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास शीला सबका यांना जाग आल्यावर बांधलेले शेळ्या व बोकड जागेवर दिसून आले नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही शेळ्या व बोकड मिळून न आल्याने त्यांनी याबाबत गुरुवार २३ डिसेंबर  रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली . तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार मनोज इंद्रेकर हे करीत आहेत.


Protected Content

Play sound