जिल्ह्यात आज दिवसभरात ११४७ जण कोरोना पॉझिटीव्ह; १२०९ रूग्ण झाले बरे !

 

 

जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार १४७  रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार  २०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह रावेर,  भुसावळ आणि चोपडा तालुक्यात संसर्ग कायम आहे. आज दिवसभरात २४  रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

 

जिल्हाभरात आजची आकडेवारी

जळगाव शहर-२३६, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-१५३, अमळनेर-३८, चोपडा-१२४  , पाचोरा-२५, भडगाव-१९, धरणगाव-३८, यावल-३३, एरंडोल-७२, जामनेर-५५, रावेर-१३९, पारोळा-२७, चाळभ्सगाव-५५, मुक्ताईनगर-४१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील १२  असे एकुण १ हजार १४७  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख १० हजार ४२४  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९७  हजार ३६२  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार १०७  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

Protected Content