सोनाळा फाट्याजवळ गॅस सिलिंडर भरलेला ट्रक कलंडला; सुदैवाने जीवितहानी टळली

पहुर. ता.जामनेर (वार्ताहर) । येथील जामनेर रस्त्यावर सोनाळा फाट्याजवळ सिलिंडरने भरलेला ट्रक उलटल्याची घटना आज पहाटे ४.३०वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अपघात होताच स्थानिक पोलिसांनी धाव घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड येथून इंण्‍डेन कंपनीच्या ३०६ गॅस सिलिंडर भरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच ४१ एजी ७०००) हा वाशीम जिल्ह्यातील मालेगांव येथे जात असतांना पहूरपासून पाच किलोमीटर अतंरावर सोनाळा फाट्याजवळ समोरून येणारे कंटेनर अंगावर आल्याने ट्रक चालकाने वाचवण्यासाठी ट्रक रस्त्याच्याविरुद्ध दिशेने  घेतल्याने मुरुमामुळे रस्त्याच्या कडेला कलंडला. ट्रक ज्या ठिकाणी कलंडला तेथून मेनलाईनचा इलेक्ट्रिक खांब आहे, जर खाबांवर हा ट्रक धडकला असता तर शाँटसर्किट होऊन सिलिंडरचा स्फोट होऊन जीवितहानी झाली असती, मात्र सुदैवाने ही दुर्घटना टळली. ट्रकमध्ये चालकासह क्लिनर होते. दोघांना किरकोळ दुखापत झाली. पहूर पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतरही उशीरापर्यंत ते पोहोचले नव्हते असे समजते.

Protected Content