दिलासादायक : अमेरिकेत कोरोना लसची पहिली मानवी चाचणी यशस्वी

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या मॉडर्ना या बायोटेक कंपनीने कोरोना लसची पहिली मानवी चाचणी यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. या वृत्तामुळे संपूर्ण जगाचे अमेरिकेकडे लक्ष लागले आहे.

 

सोमवारी, मॉडर्नाने प्राथमिक टप्प्यातील चाचणी केली. त्यानुसार एमआरएनए -1273 नावाची लस दिली गेलेल्या स्वयंसेवकाच्या शरीरात फक्त सामान्य साइड इफेक्ट्स दिसली. परंतू लसीचा प्रभाव सुरक्षित होता. तसेच लसी घेणार्‍या स्वयंसेवकाची रोगप्रतिकारक शक्ती कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांसारखी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोगांच्या राष्ट्रीय संस्थेने मार्चमध्ये निवडलेल्या ४५ पैकी आठ लोकांना या लसीचे दोन डोस दिले होते. चाचणी यशस्वी झाल्याचे वृत्त येताच अमेरिकी बाजारात मॉडर्नाचे शेअर्स २० टक्के वधारले आहेत.

Protected Content