उपविभागीय दंडाधिकारी डॉ. थोरबोले यांची प्रतिबंधीत क्षेत्रासाठी सूचना

यावल, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची यावल शहर व तालुक्यासाठी इंसिडेन्ट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसरास प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरपावली येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णाच्या घराजवळी १ किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून अतितातडीची व जीवनाश्यक सेवा वगळता कोणासही प्रवेश व बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रातील सर्वच घरांचे सर्वक्षण करण्यात येणार आहे. चेकपोस्ट एक्झिट पॉइंटवर आरोग्य क्षेत्रातील पथकाद्वारे सातत्याने तपासणी केली जाणार आहे. पथके दररोज संशयित रुग्णांचे दैनंदिन परीक्षण करतील. यात ताप, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास अडचण यासारखे कोरोनाचे लक्षण दिसून आले असता शीघ्र प्रतिसाद पथक (आर. आर. टी.) यांना कळवायचे आहे. यासह इतर सूचना इंसिडेन्ट कमांडर डॉ. अजित थोरबोले यांनी केल्या आहेत.

Protected Content