यावल महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

yaval 2

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्याहस्ते खेळ साधनांची पूजा करून थाळीफेकने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. संध्या सोनवणे या अध्यक्षस्थानी असून त्यांनी खेळाविषयी सांगितले की, शरीरस्वास्थ्यासाठी व मनाच्या संतुलनासाठी खेळ आवश्यक आहे. एखाद्या खेळात जर तुम्ही प्राविण्य मिळवले तर त्यातून नोकरीची संधी देखील प्राप्त होते. केवळ छंद म्हणून न खेळता करिअरच्या दृष्टीने खेळाचा विचार करून एखादा क्रीडाप्रकार आत्मसात करा. खेळामुळे शरीराला उत्तम प्रकारचा व्यायाम मिळून शरीर लवचिक बनते. असे ही त्या म्हणाल्या.

या क्रीडा प्रकारात 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक इ. स्पर्धा घेण्यात आल्या. या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील यांनी केले तर आभार क्रीडा समिती प्रमुख डॉ.एच.जी. भंगाळे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, प्रा.एस.आर.गायकवाड, प्रा.ए.एस.अहिरराव, डॉ.एस.पी.कापडे, डॉ.सुधा खराटे, प्रा.आर.डी.पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.राजू पावरा, प्रा.छात्रसिंग वसावे, प्रा.राजू तडवी, वासिम खाटिक, नागेश जगताप यांनी परिश्रम घेतले.

Protected Content