यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नौशाद तडवी यांची बिनविरोध निवड

यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नौशाद तडवी यांनी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या उपस्थित नगरपरिषदेच्या सभागृहात आज सकाळी निवड केल्याची घोषणा केली.

यावल नगरपरिषदेच्या तत्कालीन शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी वेळेत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. अनुसुचित जमाती गटात एकमेव महिला नगरसेवक म्हणून नौशाद मुबारक तडवी या निवडून आल्याने प्रथमच नगरपरिषदच्या इतिहासात आदिवासी महिला म्हणून नगराध्यक्षापदी तडवी यांनी निवड केली. त्यांची निवड झाल्याने आदीवासी महिला नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.

निवड करीता नौशाद मुबारक तडवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या ऑनलाईन सभेव्दारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगरसेवक अभीमन्यु चौधरी, मनोहर सोनवणे, दिपक बेहडे, डॉ. कुंदन फेगडे, नगरसेविका देवयानी महाजन, पौर्णीमा फालक, रेखा चौधरी, कल्पना वाणी, रुख्मणी भालेराव सहभाग घेतला. संपुर्ण निवडच्या ऑनलाईन प्रक्रीयेत नगरपरिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांच्यासह नगरपरिषदचे रमाकांत मोरे , शिवानंद कानडे, विनय बढे यांनी सहभाग घेतला. दरम्यान नौशाद तडवी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या गणेशनगर निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तत्कालीन प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते व आदीनी त्यांचे हार्दीक स्वागत केले.

Protected Content