यावल तहसीदार कुवर यांच्या ‘व्हाईट लिली’ काव्यसंग्रहाचा पदवी अभ्यासक्रमात समावेश

यावल प्रतिनिधी । यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी लिहिलेले ‘व्हाईट लिली’ या काव्यसंग्रहातील ‘तू एकदा पूर्वेचा’ या कवितेचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यासाठी तहसीलदार कुवर यांचे राज्यातून कवी व लेखक यांच्या कौतुक करण्यात आहे.

सदरचे अभ्यासक्रमाचे बी.ए. बी.कॉम . बी.एस्सी. पदवी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०/२१ पासून अभ्यासात समाविष्ठ असणार आहे.तहसीलदार जितेन्द्र कुवर यांची ही कविता त्यांच्या व्हाईट लिली या काव्यसंग्रहात समाविष्ट असून काव्यसंग्रह २०१९ मध्ये ग्रंथाली प्रकाशन मुंबई ने व्हाईट लिली हे प्रकाशित केले आहे यावल तहसीलदार जितेंद्र कुवर हे कवी व लेखक ही असून या पुढे ही ते आपल्या लेखणातुन आणखी काही ही काव्य करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अतिशय सोज्वळ शांत निस्वार्थ स्वभावाचे व प्रशासनात कुठलीही कुचराई न करता पारदर्शी काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची यावल तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यातसह जळगाव जिल्ह्यात त्यांनी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावल तालुक्यामध्ये तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी पदाची धुरा कोरोना विषाणुच्या संकटकाळात आपले अहोरात्र परिश्रम घेवुन आपले जिव धोक्यात घालुन लक्षवेधी कार्य केले आहे. हे सर्व कार्य यशस्वीरीत्या सांभाळत असून त्यांच्या “तू एकदा पुनवेचा” या कवितेच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यामुळे यावलचे ही नाव महाराष्ट्रभर चर्चेला आले. यामुळे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या या उल्लेखनिय कार्याचा यावल तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार व नागरिक व ग्रामस्थ कौतुक करीत आहेत.

Protected Content