सरकारी बंगले सोडण्यासाठी ९ माजी मंत्र्यांना नोटीस

नवी दिल्ली वृत्तसंस्था । महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरही सरकारी बंगले न सोडणाऱ्या माजी मंत्र्यांना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा पाठवल्या असून यात भाजपाबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे.

फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असणाऱ्या नऊ नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये रामदास कदम, सुभाष देशमुख, दीपक केसरकर, अर्जुन खोतकर आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले क्षीरसागर अशा या शिवसेनेच्या पाच माजी मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर मदन येरावर, अविनाश महातेकर, सुरेश खाडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या नऊ पैकी सात मंत्र्यांनी बंगले सोडले आहेत. केवळ मुनगंटीवार आणि क्षीरसागर यांनी अद्याप बंगले सोडलेले नाहीत. आता हे दोन्ही माजी मंत्री सरकारी बंगले कधी सोडणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट झालेले नाही.

Protected Content