विमानतळावर महापौरांनी केले शरद पवार यांचे स्वागत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विमानतळावर महापौर जयश्रीताई महाजन यांनी स्वागत केले.

खासदार शरद पवार हे आज एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर जळगावात दाखल झाले आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने खासदार पवार जळगावात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दिवंगत माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. तर यानंतर दुपारी चार वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या लोकसंघर्ष मोर्च्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास खासदार शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर महापौर जयश्रीताई महाजन यांनी त्यांचे शहरवासियांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, रोहिणीताई खडसे खेवलकर, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस रविंद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार मनीष जैन आदींची उपस्थिती होती.

Protected Content