रास्ता दुरूस्तीसाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर महामार्गावरील सुमारे ३५ किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आज मनसेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावल ते चोपडा हा बुर्‍हाणपुर ते अकलेश्वर या गुजरात आणी मध्यप्रदेश अशा दोन राज्यांना जोडणारा प्रमुख महामार्गावरील रस्ता असुन या मार्गावरील सुमारे ३०ते ३५ किलोमिटर लांबीच्या रस्त्याची अतिशय खराब व खडेमय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या मध्यभागी व ईतर ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनांचे अपघात होवुन यात अनेक निरपराध लोकांचे या अपघातात जीव गेलेले आहे. असे असतांना देखील अनेक नागरीकांचे सामाजीक संघटनाच्या वारंवार तक्रारी देवुन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत हे रस्ते दुरुस्त केले नाही. अनेक वेळा निवेदने दिले तरी त्या कडे त्यांनी दुर्लक्ष केले असून या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रिक्षा व टॅक्सी चालक मिळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोठ्या संख्येने रिक्षा चालक व टॅक्सी चालक व नागरिक मनसे जनहित पदाधिकारी उपस्थित होते. त्यात राजेंद्र निकम, उपजिल्हाध्यक्ष जळगाव अजय तायडे , उपजिल्हाध्यक्ष यावल तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे, गौरव कोळी, विकास पाथरे, निलेश खैरनार, कुणाल बारी, निलेश तायडे, प्रमोद रुले, संजय शिंपी, पवन पवार इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल चोपडा मार्गावरील रास्ता रोको आंदोलना मुळे दोघबाजुने सुमारे एक ते दिड तास वाहन थांबल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान राज्य महामार्गाचे अभियंता चंदन गायकवाड यांनी आठ दिवसात या रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येईल असे लिखित आश्वासन देण्याचे सांगितल्याने हा रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले असल्याची माहिती मनसेचे जनहित विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले .

Protected Content

%d bloggers like this: