मराठा आरक्षणावरील सुनावणी आता ५ फेब्रुवारीला !

नवी दिल्ली । मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून यावर आता ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आधी २५ तारखेपासून सुनावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर ही सुनावणी २० जानेवारीला होईल असे जाहीर झाले. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा यावरील सुनावणी पुढे ढकलून आता ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने याबाबत याचिका दाखल केलेल्या विनोद पाटील यांनी या निर्णयामुळे आज मराठा विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण खटल्याची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस. अब्दूल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र भट या पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी होणार आहे.

Protected Content