७७ टक्क्यापर्यंत डेंग्यू रोखता येणार : इंडोनेशियातील संशोधनाला मिळालेले यश

 

 

जकार्ता, वृत्तसंस्था । कोरोनाच्या थैमानासोबत डेंग्यूशी दोन हात करणाऱ्या अनेक देशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंडोनेशियामध्ये डेंग्यूच्या तापाला आळा घालण्याच्यादृष्टीने मोठे यश मिळाले आहे. यामुळे जवळपास ७७ टक्क्यापर्यंत डेंग्यूचा संसर्ग जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. डेंग्यूमुळे दरवर्षी ४० कोटी लोकबाधित होतात आणि जवळपास २५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू होतो.

इंडोनेशियामध्ये शास्त्रज्ञांनी वोलबचिया जीवाणूने बाधित केलेल्या कोट्यवधी मच्छरांना सोडले होते. हा जीवाणू डेंग्यूच्या मच्छरांना विषाणूची बाधा करण्यापासून रोखतो . ज्या ठिकाणी या मच्छरांना सोडण्यात आले त्या ठिकाणी डेंग्यू रुग्ण अन्य ठिकाणांच्या तुलनेने जवळपास ७७ टक्के कमी असल्याचे आढळले. योगकर्ता विद्यापीठातील आरोग्य संशोधक अदी उतरिनी यांनी सांगितले की, हे मोठे यश आहे. .

लंडनच्या हायजिन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिनचे तज्ञ निकोलस जेवेल यांनी सांगितले की, या संशोधनातील परिणाम आर्श्चयजनक आहे. आतापर्यंत असे यश कोणत्याही संशोधनाला मिळाले नाही. संसर्गापासून बचाव करण्याचा हा स्तर काही मोजक्याच औषधे, उपकरणांनी गाठला असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनाची सविस्तर माहिती आणि परिणाम लवकरत प्रकाशित करण्यात येणार आहे.

Protected Content