कोरोना ; भारताने अमेरिकेचा विक्रम मोडला

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशभरात शनिवारी करोनाचे सुमारे ७९,००० नवे रुग्ण आढळले आहेत. हे आतापर्यंत एका दिवसांत आढळलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. या बरोबरच देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३५ लाखांच्याही पुढे गेली आहे. गेल्या आठवडाभरात देशात करोनाचे रुग्ण जलद गतीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरात गेल्या ७ दिवसांमध्ये ४ लाख ९६ हजार ०७० रुग्ण आढळले. गेल्या ७ दिवसांमध्ये सरासरी ७० हजार ८६७ रुग्ण आढळले. गेल्या सात दिवसांमध्ये नोंद केलेली ही रुग्णांची संख्या जगात सर्वाधिक आहे. जुलैच्या उत्तरार्धात अमेरिकेत झालेल्या सर्वाधिक वाढीपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात शनिवारी सर्वाधिक १६ हजार ८६७ नवे रुग्ण आढळले. २६ ऑगस्टला महाराष्ट्रात १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. होते

आंध्र प्रदेश (१०,५४८, सतत चौथ्या दिवशीबी १० हजारांहून अधिक), कर्नाटक (८,३२४, गेल्या पाच दिवसांमध्ये ८ हजारांहून अधिक), तामिळनाडू (६,३५२) आणि उत्तर प्रदेशात (५,६८४) सर्वाधिक रुग्ण आढळले. तामिळनाडूत २९ जुलैनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेला होता. चार दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे ४९,००० ची वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख ६६ हजार २२६ इतकी झाली आहे.

शनिवारी ६४ हजार ६८१ रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २७ लाख ६ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. करोनामुळे शनिवारी ९४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या पाच दिवसांमध्ये १००० पेक्षा कमी होती. महाराष्ट्रात आतापर्यंत २४ हजार १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content