९९ टक्के बॉलिवूड घेते ड्रग्ज! : कंगना राणावतचा धक्कादायक दावा

मुंबई । बॉलिवूडमध्ये काम करणारे ९९ टक्के लोक ड्रग्जचे सेवन करतात, असा खळबळजनक दावा अभिनेत्री कंगना राणावत हिने केला आहे. आपल्यालाही यात ओढण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आपण तो हाणून पाडल्याची माहिती देखील तिने दिली आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

कंगणा राणावत हिने अलीकडच्या काळात अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर मांडल्या आहेत. यात आज तिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

बॉलिवूडमधील कलाकार ड्रगचे सेवन पाण्यासारखे करतात. यातील जवळपास ९९ टक्के लोकांनी कधी ना कधी ड्रग्जचे सेवन केले असेल, असा दावा कंगनाने यात केला आहे. या जाळ्यात मलाही ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आपण यात आलो नसल्याचेही ती म्हणाली.

यात कंगनाने पुढे म्हटले आहे की, या क्षेत्रातील काहींना आरोग्याच्या कारणासाठी अंमली पदार्थांचे सेवन केले असेल, काहींनी वय झाले असेल म्हणून तर काहींनी ताणतणावामुळे! जर पार्टी असेल तर प्रत्येकजण त्यामध्ये गुंतलेला असतो. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे चित्रपटसृष्टी एखाद्या गटारसारखी झाली आहे. या पार्ट्यांमध्ये एलएसडी, कोकेन आदींसह अन्य ड्रग्जचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचा गौप्यस्फोटही तिने केला.

Protected Content