जामनेरात स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसील आवारात ध्वजारोहण उत्साहात

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रगीत म्हणून ध्वजला पोलिसांनी मानवंदना दिली, त्याचबरोबर राज्य गीत गायन झाले, याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर, जामनेर नगरपालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, बांधकाम अभियंता आर.डी. पाटील, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, सामाजिक वनीकरण अधिकारी समाधान पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पी एम किसान योजनेच्या केवायसी व बँक आधार कार्ड लिंक करण्यासाठी जामनेर तहसील विभागातर्फे १९ ऑगस्ट रोजी बाबाजी राघव मंगल कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जामनेर तालुक्यातील शेतकरी बंधू यांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार नानासाहेब आगळे केली आहे.

Protected Content