राम सुतार यांना ‘कांताई जैन साहित्य कला जीवन गौरव’ पुरस्कार

 

जळगाव प्रतिनिधी | भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आला. दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि.सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना समारंभपूर्वक वितरण करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा होय. सर्व पुरस्कार ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
साहित्यिकांचा सन्मान करणे हे समाजासाठी चांगले कार्य जैन उद्याेग समूहातर्फे केले जात असून ही बाब काैतुकास्पद अाहे. साहित्यिकांनी माेठे हाेण्यासाठी उगाच गुळगुळीत भाषा न वापरता अापापल्या परिसरातील असंताेषाचे चित्र मांडावे, असे मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक कविवर्य ना.धों. महानोर उपस्थित होते. व्यासपीठावर संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. साेहळ्याची सुरुवात पसायदानाने झाली. ना.धों.महानोर यांच्याहस्ते लढाखचे लोकवाद्य वाजवून झाले. पुरस्काराविषयीची भूमिका आनंद गुप्ते यांनी प्रस्तावनेत सांगितली. चारही पुरस्कार विजेत्यांच्या कार्यपरिचयात्मक लघुपट दाखविण्यात आला. ज्ञानेश्वर शेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुरस्कारार्थींनी अापल्या भावभावना व्यक्त करताना फाउंडेशनचे काैतुक केले.
करून समाजातील स्त्रीभ्रूणहत्या या ज्वंलत प्रश्नाला शिक्षित समाज अधिक जबाबदार असल्याचे सांगितले.

Protected Content