येस बँकेच्या जळगाव शाखेत खातेदारांची गर्दी

जळगाव प्रतिनिधी । रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध आणल्यानंतर या बँकेच्या जळगाव येथील शाखेतही खातेदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे.

काल सायंकाळी रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्याची घोषणा केली. याच्या अंतर्गत खातेदारांना महिनाभरात फक्त पन्नास हजार रूपये काढता येणार आहेत. यामुळे रात्रीपासूनच अनेकांनी एटीएममधून पैसे काढण्यास प्रारंभ केला. आज सकाळी बँकेच्या शहरातल्या स्वातंत्र्य चौक भागात असणार्‍या शाखेत खातेदारांनी गर्दी केली आहे. यातच एटीएम बंद असल्याने पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, शाखेतील नेट बँकींगच्या सुविधेतही अडचणी येत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.

Protected Content