महापालिकेतील अभियंता भोसले बडतर्फ तर लुले पदावनत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव महापालिकेचे सहायक अभियंता अरविंद भोसले यांना बडतर्फ करण्यात आले असून शाखा अभियंता गोपाळ लुले यांना पदावनत करण्यात आले असून याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आज सेवानिवृत्त होत असतांना याआधी त्यांनी एका निर्णयाच्या माध्यमातून सहायक अभियंता अरविंद भोसले यांना बडतर्फ करण्यात आले असून शाखा अभियंता गोपाळ लुले यांना पदावनत करण्यात आले असून याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

सहा वर्षांपुर्वी नगररचनाचे सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्या बचावासाठी त्याच विभागाच्या सहा अभियंत्यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात सहायक अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठाचे प्रमुख अभियंता गोपाळ लुले यांच्यावर तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी बडतर्फीची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात दोघांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर झालेल्या सुनावणीत सदर कारवाई करताना आयुक्तांनी प्रशासकीय प्रक्रीया पार पाडली नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे चौकशी अहवाल दिल्यानंतर दोघांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दोघांना बडतर्फ का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीस बजावली होती. त्यात लुले यांनी म्हणणे सादर केले. तर भोसले यांनी रजेचा कालावधी वाढवून घेतला. दरम्यान आयुक्तांनी गुरुवारी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुर्वीच्या आयुक्तांची कारवाई कायम ठेवत भोसलेंवर बडतर्फीची कारवाई केली. तर लुले यांना पदावनत करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: