Home क्राईम मोटार सायकल न दिल्याने मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या !

मोटार सायकल न दिल्याने मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या !


भंडारा (वृत्तसंस्था) मोटार सायकल चावी दिली नाही म्हणून एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचाच खून केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातल्या केशलवाडा वाघ गावात राहणाऱ्या लोकेश टिचकुले (वय २१) याचे वडिलांसोबत नेहमी वाद होत होते. वडील ताराचंद टिचकुले शेतावरुन परतल्यानंतर लोकेशने त्यांच्याकडे मोटार सायकलची चावी मागितली. मात्र वडिलांनी चावी देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. ताराचंद यांनी संतापात लोकेशला काठीने मारहाण करायला सुरुवात केली. यंत्र लोकेशने ती काठी हातातून खेचत वडिलांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ताराचंद यांचा मृत्यू झाला. आपले वडील मयत झाल्याचे लक्षात येताच लोकेशने पोलीस ठाण्यात स्वःतहून हजर झाला.


Protected Content

Play sound