भारतीय जैन संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठीत

jain sanghatana

जिल्हाध्यक्षपदी अशोक चोपडा (काकाजी) तर महिला अध्यक्षपदी सुजाता मुणोत यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जैन संघटनेची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी काकाजी स्क्रिनचे अशोकचंद चोपडा व महिला अध्यक्षपदी सुजाता विरेंद्र मुणोत निवड करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या सदस्यांचा पदग्रहण सोहळा बुधवार 2 एप्रिल रोजी भारतीय जैन संघटना हॉल मध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरवात मंगलाचरणाद्वारे झाली. मंगलाचरण करिष्मा कटारिया, खुशबु चोपडा यांच्या सुमधुर संगीताने झाली. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

याची होती उपस्थिती
सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर हस्तीमल बंब (जालना) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद खिंवसरा (अमलनेर), महाराष्ट्र प्रदेश सदस्य विनय पारख, खान्देश विभागीय पुर्व मंत्री डॉ. अशोक श्रीश्रीमाल, पूर्व महिलाध्यक्षा ममता कांकरिया, रत्नाकरजी महाजन (बी.जे.एस.), यांची बी.जे.एस.तर्फे प्रमुख उपस्थिती होती.

 

 

उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
श्री रत्नाकर महाजन यांनी स्मार्ट गर्ल या कार्यक्रमाबद्दल सांगितले. यात बेटी बचाव, बेटी पढाओं च्या पुढील योजना त्यांनी सांगितली. यानंतर श्री विनयजी पारख यांनी खान्देश व महाराष्ट्रात चाललेल्या कार्यक्रमाबद्दल सांगितले. तसेच त्यांच्या कार्यकाळात केलेले विवाह सम्मेलन, 115 दिवसात 120 रेकॉर्डब्रेक कार्य इत्यादीची आठवण करुन दिली. तदनंतर बी.जे.एस. महाराष्ट्र चे अध्यक्ष हस्तीमलजी बंब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाराष्ट्रभर चाललेल्या कार्यक्रमाबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांनी बघितलेल्या 350 कार्यक्रमापैकी सगळ्यात चांगली उपस्थिती व अतिउच्च दर्जाचा हा जळगांव येथील सोहळा आहे. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यानंतर दलुभाऊ जैन यांनी आपली शुभकामना आणि मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की अशोकजी चोपडा व त्यांची संपूर्ण टीम हे तळागळातील कार्यकर्ते असुन आजपर्यंत केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे व आता त्यांना अजुन कार्य करायचे आहे, हे सांगितले.

उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा सत्कार
यानंतर समाजातिल अतिविशेष उपलब्धी प्राप्त व्यक्तींचा सत्कार झाला. यात रिकेश गांधी, तनेश जैन, विराज कावडीया, पंकज सुराणा, श्रेयस मुथा, आकाश चोपडा यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन कार्यकारिणी जाहिर
नुतन जिल्हाध्यक्ष : अशोकचंदजी चोपडा, उपाध्यक्षपदी अशोक कोठारी, प्रकाश कोठारी, सचिव प्रकाश कटारिया, कार्याध्यक्षपदी नरेंद्र जैन, कोषाध्यक्ष राजेश भंडारी, सहकोषाध्यक्ष चंद्रकांत जांगडा, मिडीया प्रसिध्दी प्रमुख ईश्वर छाजेड, जनसंपर्क अधिकारी आकाश चोपडा, कार्यसमिती राहुल गोलेच्छा तर नुतन महिलाध्यक्षा सुजाता मुणोत यांची नियुक्ती करण्यात आली.

शपथग्रहण सोहळा
यावेळी शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. डॉ. अशोक श्रीश्रीमाळ यांनी नुतन अध्यक्षांचा परिचय दिला. शपथविधी अधिकारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हस्तीमलजी बंब यांनी अशोकचंद चोपडा (काकाजी) यांना बी.जे.एस. जळगांव जिल्हा अध्यक्षपदाची व सुजाता मुणोत यांना महिलाजिल्हाध्यक्षपदाची शपथ दिली. यानंतर दोन्ही नुतन अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमात अजय ललवाणी, स्वरुप लुंकड, अनिल सांखला, अनिल पगारिया, दिलीप गांधी, शंकरलाल कांकरिया, सौ. भावना शर्मा, प्रदिप मुथा, रुपेश लुंकड, माणकचंदजी बैद, कांतीलाल कटारिया, विजय चोपडा, विजय लुणिया, रमण छाजेड, राजेश दोशी, नितीन चोपडा, विशाल चोरडिया, राजकुमार सेठिया आदि मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी जय आनंद ग्रुप, जे.पी.पी. फाऊंडेशन, जलगांव जिला गोल्ड जैन कॉन्फरंस, प्रार्थना ग्रुप, युवाचार्य ग्रुप चे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर सुग्रास भोजनाची व्यवस्था दिनेश टाटीया यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजाता मुणोत व आकाश चोपडा यांनी केले तर आभार सचिव प्रकाश कटारिया यांनी मानले.

One Response

  1. विजय लुणिया

Add Comment

Protected Content