चाकू घेवून दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ असलेल्या तनय हॉटेलसमोर एक तरूण हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रताप शिकारे यांना मिळाली.  त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या. पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी,  आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक मुदस्सर काझी, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, साईनाथ मुंडे यांनी गुरूवार ५ मे रोजी दुपारी दीड वाजता कारवाई करत संशयित आरोपी पराग प्रकाश लोहार (वय-२०) रा. योगेश्वर नगर ज्ञानचेतना  आपारमेंट खेडी ता.जि. जळगाव याला ताब्यात घेतले. त्याकडून चाकू हस्तगत केला आहे. त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.

Protected Content