आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हा : अनिकेत पाटील

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फॉलो करत येणाऱ्या जवळच्या काळात होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिकेत पाटील यांनी कार्यकर्त्याना केले.

येणाऱ्या जवळच्या काळात महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होवू घातल्या असून भाजपा युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळुन देण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या क्षेत्रातल्या आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा विजयाचा मार्ग सुकर होइल असे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिकेत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले.

यावलच्या तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात पार पडलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या यावल, रावेर तालुक्यातील पदाधिकाऱ्याच्या संपन्न झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिकेत पाटील हे होते.

समाज माध्यमाचे अनेक पर्याय आपल्याकडे असू न, या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फॉलो करू शकतात. त्यासाठी आपण सर्वांना जागृत राहणे अत्यंत गरजेचे असल्याची मार्गदर्शनपर माहीती पाटील यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिली. या बैठकीत पक्ष संघटन व पक्षाअंतर्गत विषयांवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सागर चौधरी, सागर भारंबे, अजय भालेराव, यावलचे माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तालुका सरचिणीस विलास चौधरी, यावल तालूका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर कोळी, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, व्यंक्टेश बारी, रितेश बारी, शुभम चौधरी, भुषण फेगडे, भुषण नेहते, शरद तायडे यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचलन सागर कोळी यांनी केले तर आभार भाजपा युवा मोर्चाचे रावेर तालुका अध्यक्ष महेन्द्र पाटील यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!