ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियान : तिसरे सत्र अतिदुर्गम भागात

यावल प्रतिनिधी । येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान तिसऱ्या टप्प्यात दुर्गम आदिवासी भागात पोहोचली असून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

यावल तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास तिसऱ्या  सत्राला सुरुवात करण्यात आली  हे अभियानाचे तिसरे सत्र अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवानी सुद्धा  या अभियानाला उत्तम प्रतिसाद दिला . या अभियानास  हरीपुरा व मोहरला  असे दोन गावातील नागरिकांचा समावेश होता सदर अभियान ग्रामपंचायत कार्यालय समोर मोहरळा तालुका यावल येथे आदिवासी बांधवांचे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास तिसऱ्या टप्यात  पोचले. सदर अभियानास  एकूण  369 लाभार्थ्यांच्या नांवाची नोंदणी करण्यात येवुन नागरीकांनी या अभियानाचा लाभ घेतला.

यावेळी मोहराळा गावातील सरपंच नंदा महाजन यांनी व उपसरपंच जहाँगीर तडवी यांनी गावाचे प्रथम नागरीक म्हणुन डॉ कुंदन फेगडे यांचा पुष्पगुछ देऊन  सत्कार केला. यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मोहराळा गावाचे सरपंच नंदा गोपाळ महाजन, उपसरपंच जहागीर तडवी, लहू पाटील, ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, भरत महाजन, भावना महाजन, शबाना तडवी, सुलेभान तडवी सुलतान तडवी, गफार तडवी, सुनील पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शरीफ तडवी किरण पाटील  आदींची उपस्थिती होती.

महा अभियानास यशस्वी करण्यासाठी  रितेश बारी, सागर लोहार ,मनोज बारी, विशाल बारी, जयवंत माळी, चेतन कापुरे अक्षय राजपूत  यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले.

 

Protected Content