युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल व इन्फीनिटी क्लासेसतर्फे गुणगौरव सोहळा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल व उचंदे येथील इन्फिनिटी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर येथील लेवा पाटील समाज मंगल कार्यालय येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोबत पालकांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

या प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून भारतातील सर्वात तरुण पॅरेंटिंग कोच व मोटिवेशनल स्पीकर   साजिद पटेल सरांनी पालकांना दोन तास मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी डॉ.विक्रांत जयस्वाल,  डॉ.सौ प्रणिता सरोदे,  सौ.दिपाली पंकज चौरे,  डॉ. दिवाकर पाटील,   शरद भालेराव , फैजान शेख व शाळेचे संस्थापक अध्यक्ष मासुळे सर उपस्थित होते.

या कार्यक्रमात एमबीबीएस व बीएएमएस ला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा  त्याचप्रमाणे इयत्ता दहावी सीबीएसई  व स्टेट बोर्ड  च्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.  कु. साक्षी अशोक लवंगे , कु. तनुष्का सतीश पाटील,  आर्यन पंकज चौरे, मुग्धा तेजांशू सरोदे  व प्रियंका किशोर ढोमणे या सर्व गुणवंतांनी नीट पात्रता परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेले आहेत. त्याचप्रमाणे विशाल विनीत तळले,  इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत ९६ गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे.  कु. श्लोक विवेक ठाकूर ९२%; जानवी अनिल पाटील ८७%; त्याचप्रमाणे उचंदे येथील इन्फिनिटी कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी  तेजल संभाजी पाटील ९२%;विशाखा चौधरी ९०% मोहिनी पाटील ८९ या आणि अन्य सर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री मासोळे यांनी केले.

Protected Content