अपघातात दाम्पत्य जखमी; दुचाकींचेही नुकसान

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरापासून जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी श्रावण रामदास भोई (वय-५०) हे त्यांची पत्नी आशाबाई भोई यांच्यासोबत शनिवारी ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांची दुचाकी (एमएच १९ बीवाय ७०२५) ने अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे जाण्यासाठी निघाले होते. गावाजवळील पेट्रोल पंपा जवळ पेट्रोल भरण्यासाठी जात असताना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईबी १०९६) वरील चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघी दाम्पत्य गंभीर जखमी झाले तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी समोरील दुचाकी धारक चेतन भावलाल देवरे रा. मुक्ताईनगर यांच्या विरोधात सोमवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

Protected Content