यावल येथे शिक्षकांसाठी बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक शिबीराचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागा व्दारे बाल लैंगिक शोषण शिक्षणा संदर्भातील प्रतिबंध करणारे वैयक्तिक सुरक्षा या विषयाचे आधारे तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा खाजगी प्राथमिक शाळा यांचे १०० टक्के शिक्षकांना प्रशिक्षण दिला जात आहे.

यावल येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे सदरचे प्रशिक्षण दिले जात असुन , सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजे पर्यंत यावल तालुक्यातील शंभर टक्के शिक्षकांना सदरचे प्रतिदिन प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण शिबीरात प्रतिदिन १०० च्या जवळपास शिक्षकांची उपस्थिती आहे. तालुक्यातील एकुण ४९७ शिक्षकांना पाच दिवसात टप्प्या टप्प्यात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक शिक्षण दिला जाणार आहे.

या प्रशिक्षण शिबीरा मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून आम्ही कोरेगावकर आणि कुसुम नाईक हे पीपीटीचे माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदरचे शिक्षकासाठीचे हे प्रशिक्षण शिबीर अत्यंत महत्त्वाचा असे असून या शिक्षणाचा फायदा विद्यार्थी व पालकांना होणार आहे या प्रशिक्षणाचा नियोजन यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नमुद्दीन शेख ,शिक्षण विस्तार अधिकारी विश्र्वनाथ धनके तसेच गट साधन केंद्रातील मांडवकर सर, तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर सुरू आहे .अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण मध्ये शिक्षक व शिक्षिका या बाल लैंगिक शोषण प्रशिक्षणास आत्मसात करीत असून, याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे अनेक उदाहरण देऊन अनेक पीपीटीचे माध्यमातून विविध प्रश्नावर विचार विनिमय केला जात आहे. आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना हा प्रशिक्षण उपयुक्त आहे असा शिक्षकांमध्ये बोललं जात आहे अत्यंत सुस्थितीत साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम के पाटील यांच्या विशेष सहकार्याने सर्वतोपरीची सोय सुविधा उपलब्ध करून सदरचे प्रशिक्षण शिबीर घेतले जात आहे. या पद्धतीने आज प्रशिक्षण शिबीराचा चौथा दिवस असून, मंगळवार २९ नॉव्हेबर शिबीराचा शेवटचा दिवस आहे. या प्रशिक्षण मध्ये तालुक्यातील सर्व शिक्षकांना बाल लैंगिक शोषण संदर्भातील व्यक्तीक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Protected Content