आदिवासी लोकगितांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचलीत जे. टी. महाजन इंग्लिश स्कुल यावल मध्ये आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

 

यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा. डॉ किरण खेट्टे व रंजना महाजन उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

 

याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सिमरन तडवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आदिवासी दिना निमित्ताने मार्गदर्शन  करतांना आदिवासी दिन का साजरा करण्यात येते,आदिवासी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या थोर क्रांतीवीर बिरसा मुंडा व आदी थोर समाजसेवक यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली, यावेळी  इतया ७ वीच्या विद्यार्थिनीं यांनी आदिवासी समाज बांधवांचे पारंपारिक वेशभुषा व वस्त्र परिधान करून आदिवासी लोकभाषावरील लोकगीतांवर सुन्दर असे नृत्य सादर केले.

 

या बद्दल जे टी महाजन इंग्लीश शाळेच्या प्रार्चाया रंजना महाजन व प्रा किरण खेट्टे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूचिता पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रिती भार्गव यांनी मानले. जे. टी. महाजन स्कुल यावल मध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेल्या जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संपुर्ण प्रार्चाया रंजना महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुलच्या शिक्षीका व शिक्षक यांनी महत्वाचे परिश्रम घेतले .

Protected Content