आहारात तृणधान्याचा समावेश अधिक प्रमाणात करावा :- धनश्री चासकर

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपले आरोग्य चांगले सुदृढ आणी निरोगीमय राहण्यासाठी दररोजच्या आहारात तृणधान्याचा समावेश अधिक प्रमाणात करावा असे प्रतिपादन जामनेर विभागाच्या मंडळाधिकारी श्रीमती धनश्री चासकर यांनी टाकरखेडा येथील शाळेत पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत जनजागृतीपर  कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलतांना सांगितले.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे होते. याप्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी जामनेर अकील तडवी यांनी विद्यार्थ्यांना बोलके करून तृणधान्यांची नावे विचारून तृणधान्याचे महत्व विशद केले.

मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी तृणधान्य विषयी माहिती देतांना सांगितले की, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे महत्व विचारात घेता संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषीत केले असून या जनजागृतीच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना तृणधान्याविषयी जागरूकता वाढेल आणी या माध्यमातून त्यांचे आरोग्य सुधारण्यास सहाय्यभूत ठरेल.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाना धनगर यांनी केले व आभार मानले. सदर कार्यक्रमास ग्रामरोजगार सेवक युवराज बावस्कर, पालक निवृत्ती आगळे, उपशिक्षक जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, श्रीमती निर्मला महाजन इत्यादी उपस्थित होते.

Protected Content