रावेर तालुक्यात कोरोनाचा वाढला संसर्ग

रावेर प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर दीर्घ काळापर्यंत तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नसला तरी अलीकडच्या काही दिवसांमध्ये तालुक्यातील रूग्णांची संख्या गतीने वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणा धास्तावली आहे.

रावेर तालुका हा बर्‍याच दिवसांपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. तथापि, अलीकडच्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोना झपाट्याने पसरल्याचे दिसून येत आहे. यात आज तीन रूग्णांची भर पडली आहे. निंभोरा सीम येथे दोन जण तर शहरातील आठ वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. सावदा येथे पत्ता दिलेले दोन रूग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद केले असले तरी स्थानिक प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. यामुळे तालुक्यात आज तीन रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनावर तणाव आल्याचे दिसून येत आहे.

Protected Content