प्रोटानचे विविध मागण्यांसाठी आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी । राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षण सेवक, विषय तज्ञ प्राध्यापक यांच्या विविध समस्यांवर जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

 

नवीन शिक्षण धोरण २०२० शिक्षणाच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारे व त्यातून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवून गुलाम करणारे धोरण आहे. म्हणून आरएमबीकेएस व प्रोटॉन या धोरणाचा विरोध करत आहे.  सरकारकडून सरकारी क्षेत्राचे निमसरकारी व सार्वजनिक उद्योग प्रकल्प तसेच सर्व स्तरावरील  शिक्षण क्षेत्राचे होत असलेल्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या संपवला जात आहे. म्हणून संघटन खाजगीकरणाचा विरोध करत आहे.

 

या आहेत प्रमुख मागण्या

अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावी. शिक्षण विभागांतर्गत तालुकास्तरावर कार्यरत असणाऱ्या साधन समूह विषय तज्ञ व्यक्तींना मानधन आयोजित पूर्णवेळ वेतन सैनिक व वेतनश्रेणीत समावून घ्यावे व इतर सवलती लागू कराव्यात.  सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना लागू करण्यात आलेली अन्यायकारक डीसीपीएस व एनपीएस ही पेन्शन योजना रद्द करून पुढील प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करावी. कॅश अंतर्गत पदोन्नती साठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना निर्धारित पत्र दिनांकापासून वेतनवाढ व इतर लाभ देण्यात यावी.

याप्रसंगी प्रोटानचे दिनकर पुंडलिक पाटील, प्रशांत बळीराम लवंगे, महेंद्रकुमार शालिग्राम तायडे,  आरएमबीकेएसचे   प्रमोद शांताराम तायडे,  आर. बी. परदेशी,  यशराज निकम,  प्रोटानचे  जितेंद्र रायसिंग, मिलिंद निकम आदी या आंदोलनात सहभागी झाले होते

Protected Content