जळगावात केळी विक्रेत्याला मारहाण; तरूणाविरोधात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील केळी घेण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाकडून केळी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख फारुक शेख अब्दुल बागवान (वय-६३) रा. भोई गल्ली, जोशी पेठ जळगांव हे जळगाव शहरातील बेंडाळे चौक येथील रिक्षा स्टॉपजवळ केळी विक्रीचे काम करतात. सोमवारी २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास केळी विकत असताना गणेश किरण कापडणे (वय-२५) रा. तिरुपती बिल्डिंग जवळ जळगाव हा केळी घेण्यासाठी आला.  यात गणेशने केळी काय भाव आहे, त्यावर शेख फारुख म्हणाले की, २० रुपये लागतील असे बोलले. याचा राग आल्याने तरूणाने केळी विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. अंगावरील शर्ट फाडून नुकसान केले व तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली, याप्रकरणी रात्री ९ वाजेच्या सुमारास शेख फारुक शेख अब्दुल बागवान यांनी तरुणाविरोधात शनीपेठ पोलीसात तक्रार दिली आहे.  पुढील तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

 

Protected Content