महावितरणच्या भोंगळ कारभाराने बामणोदकरांचे हाल

bamnod nivedan

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद गावातील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गत पाच दिवसांपासुन विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अभीयंता गौरव वाघुळदे यांच्या तक्रार केली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, बामणोद येथील स्वामीनारायण गल्लीतल्या डिपीवरून होणारा महावितरण कंपनीचा विजपुरवठा खंडीत झाला असुन, या महावितरणच्या कार्यालयावर रात्रीच्या एकही कर्मचारी दिसुन येत नसल्याने ग्रामस्थांनी आपली तक्रार कुठे करावी हेच समजेनासे झाले आहे. या गल्लीतील विद्युत पुरवठा गेल्या पाच दिवसापासुन बंद असल्याने उकाड्यामुळे ग्रामस्थ मात्र कमालीचे त्रस्त झाले अहेत. यामुळे गल्लीत राहणार्‍या ग्रामस्थांनी बामणोद येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता गौरव वाघुळदे यांना या खंडीत झालेल्या विद्युत पुरवठ्या बदल लेखी तक्रार निवेदन दिले असून यात या समस्येेचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनावर रत्नाकर जावळे, पुरुषोतम भोळे, योगेश ढाले, ज्ञानदेव कोल्हे, पवन कोल्हे, सागर पाटील, निलेश भिरूड, लखन कोल्हे, किरण झोपे, अनिल भोळे,किरण वाघुळदे, सौ. उषा सरोद सौ. देवयानी राजेंद्र झांबरे, सौ. मंगला अजय भोळे, सौ. रजनी किसन इंगळे, सौ. कौसल्या राजेन्द्र जावळे सौ. भाग्यश्री जावळे, सौ. चेतना तुषार जावळे सौ. चारूलता हेमंत इंगळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content