ज्ञानगंगा महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांना वंदन

shahu maharaj jayanti jamner

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंदन करण्यात आले.

प्राचार्य आर.जे.सोनवणे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. विद्यालयात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य सोनवणे व विद्यालयाचे उपशिक्षक बाविस्कर यांच्याकडून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सोनवणे यांनी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती व त्यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्ती बाबत माहिती दिली. उपशिक्षक विनय खोंडे यांनी आभार मानले.

Protected Content