फिनीक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे हुतात्मा स्मारकांना अभिवादन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे फिनीक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या वतीने क्रांती दिनी हुतात्म्यांना वंदन करण्यात आले.

 

फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपच्या अध्यक्षा ललीताताई पाटील यांच्या मार्फत क्रांती दिनाचे आच्चित्य साधून अमळनेर शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना पुष्पचक्र व फुलंहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याखाली सर्वानी हातात माती घेऊन राष्ट्र विकासासाठी पंच प्रण शपथ घेतली.

 

अमळनेर शहरातील तहसील कार्यालय आवार हुतात्मा स्मारक साने गुरुजी पुतळा, समशेर पारधी स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, राणी लक्ष्मी चौकातील लाल बावटा स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पैलाड नाका जवळील हुतात्मा स्मारक, अहिल्यादेवी होळकर महाराणा प्रताप स्मारक, अण्णाभाऊ साठे स्मारक, गाडगेबाबा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीज्योती महात्मा फुले स्मारक या सर्व स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व वसुंधरा लांडगे यांच्या सुरेल आवाजात प्रत्येक स्मारकाजवळ देशभक्तीपर गीत क्रांती गीत व समर गीत गाऊन वैशिष्ट्य पूर्ण श्रध्दांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

 

या कार्यक्रम प्रसंगी फिनिक्स ग्रुप अध्यक्ष ललिता पाटील , वसुंधरा लांडगे मॅडम पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनालकर; मोहन सातपुते, डॉ प्रतिभा मराठे, अनिता पाटील, कोमल जैन, प्रा. प्रकाश महाजन, प्रा आशिष शर्मा, पन्नालाल मावळे व इतर अनेक मान्यवर सहकारी उपस्थित होते.

Protected Content