अमळनेरात एचआयव्ही बाधित बालकांना सकस आहाराचे वाटप

अमळनेर, प्रतिनिधी | येथील आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने एचआयव्ही बाधित बालकांना फराळ व सकस आहाराचे वाटप करण्यात आले.

तालुक्यात एचआयव्हीने बाधित असलेल्या बालकांनाही दिवाळी सण उत्साहात साजरी करण्यात यावी. सामाजिक जाणिवेतून बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सदर बालकांना फराळ व सकस आहाराचे वाटप करून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील यांनी आपले मनोगतात सर्व रोटरी परिवाराचे मागील दोन वर्षापासून सातत्याने करीत असलेल्या मदतीबाबत मनःपूर्वक आभार मानले. दरम्यान स्व. नरेंद्र मुलजी शहा व कांचन बाई संकलेजा यांच्या परिवाराकडून प्रोटीन व स्वादिष्ट नमकीन निलेश पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरीचे प्रेसिडेंट रिषभ पारेख सेक्रेटरी प्रतिक जैन प्रोजेक्ट चेअरमन राजेश जैन, प्रमुख अतिथी म्हणून रोट्रियन रमेश जिवनानी, आधारच्या अध्यक्ष डॉ.भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणु प्रसाद ज्येष्ठ रोटरी सभासद, पी. बी. एस स्कूलचे प्रिन्सिपल देवरे, रोटेरियन अभिजित भांडारकर, ताहा बुकवाला, आशिष चौधरी , कीर्ती कोठारी , देवेंद्र कोठारी, विवेक देशमुख, रोहित सिंगवी , महेश पाटील, ईश्वर सेनानी, मकसूद बोहरी आधार संस्थेतर्फे अश्विनी भदाने राकेश महाजन ,कलीम खान, वैशाली शिंगाणे व तोसिफ शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी भदाने यांनी तर सेक्रेटरी प्रतीक जैन यांनी प्रास्ताविक मांडले.

Protected Content