दोरीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या

यावल प्रतिनिधी । येथील सिध्दार्थनगर परिसरातील व्यक्तीने खाटेच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , यावल शहरातील सिद्धार्थनगर या परिसरात राहणारे रामकृष्ण रमेश गजरे (वय ४८ वर्ष, धंदा मजुरी) यांनी दिनांक १६ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील परिसरात खाटेवरच खाटेच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत रामकृष्ण रमेश गजरे यांचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. रामकृष्ण गजरे यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, चार मुली, जावई-नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

Protected Content