पत्नीच्या स्मरणार्थ पतीने केले गोदान ! : राणे कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील स्वर्गवासी पद्मावती पंढरीनाथ राणे यांचे पती पंढरीनाथ भवानी राणे यांनी आपल्या पत्नीच्या जिवात्म्यास चिरशांती लाभावी यासाठी यावल तालुक्यातील निमगाव येथील गोवर्धन गौशाळेस गोदान देऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे .

स्वर्गवासी पद्मावती राणे यांना सामाजिक कार्याची आवड होती म्हणून त्याच्या पावलावर पाऊल ठेवत गोदान देऊन आपले सत्कर्म करीत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

भुसावळच्या राणे बंधूनी गोवर्धन गोशाळेस दिलेलं हे दान श्रेष्ठदान आहेच असेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन सध्या चारा व पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी देखील पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ कोळी यांनी केले.

यावेळी गोवर्धन गौशाळेचे स्वस्थापक अध्यक्ष गोपाळ भावलाल कोळी, उपाध्यक्ष अरुण एकनाथ तावडे,
पंढरीनाथ भवानी राणे, लीलाधर राणे, लीलाधर जंगले, सचिव चेतना कोळी, सह सचिव विजया तावडे सुशिलाबाई जंगले गोसेवक प्रकाश तावडे आदी उपस्थित होते. तसेच निमगाव तालुका यावल येथील भुषण गजानन लोकाक्षी यांचे कडुन स्वर्गवासी गजानन बळवंत लोकाक्षी यांचे स्मरणार्थ उळीद चुनी पोते साठी ११११ रुपये दान दिलेत.

आध्यात्मिक दृष्टीने माणसांवर जन्मानंतर काही प्रकारचे ऋण असतात. मातृ पितृ व संत ऋण यापैकी आम्ही पत्नीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गोसेवा श्रेष्ठ साधन आहे. पूर्वजनांना व स्वर्गवासी पत्नी सद्गती मिळावी, यासाठी गोसेवा करावी, या दृष्टीने गोदान करून छोटेसे योगदान आम्ही गोवर्धन गोशाळेसाठी दिले असल्याची माहिती पंढरीनाथ राणे यांनी दिली .

Protected Content