Home धर्म-समाज यावलच्या चिमुकल्यांनी केला रमजानचा पहिला रोजा पूर्ण

यावलच्या चिमुकल्यांनी केला रमजानचा पहिला रोजा पूर्ण

0
47

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील सिदरा फातेमा( ७ वर्ष) व जाहीद खान (१० वर्ष) साकळी या दोघा चिमुकल्यांनी पवित्र रमजानचा पहिला रोज़ा पूर्ण केला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून यावल शहरातील रहिवासी इमरान खान यांची मुलगी सिदरा फातेमा इमरान खान ( वय ७ ) व साकळी तालुका यावल येथील केळीचे व्यापारी अस्लम खान अय्युब खान यांचा पुतण्या व सामाजिक कार्यकर्त वसीम खान यांचा१० वर्षाचा मुलगा जाहीद खान याने पवित्र रमजानचा आपल्या जीवनातला पहिला रोजा (उपवास ) ठेवला. सध्याचे वाढलेले तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी न पिता उपाशी पोटी राहून यांनी ( अल्लाह ) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या दोघाच्या कुटुंबातील आजी आई वडील काका व नातेवाईक बांधव सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound