भीषण अपघात : अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; दोन ठार

पाचोरा-भडगाव रस्त्यावरील मध्यरात्रीची घटना; मयत पाचोरा शहरातील

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण जागेवरच ठार झाला तर एकाचा जळगांव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना भडगाव रोडवरील अंकीत कॉटन जिनिंग जवळ घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोपाल गोवर्धन पुजारी (वय – ४०) रा. बाहेरपुरा, पाचोरा व खुशाल अर्जुन सोनार (वय – २५) रा. संभाजी नगर, पाचोरा हे दि. २८ नोव्हेंबर रोजी आमडदे ता. भडगाव येथे यात्रेत व्यवसायासाठी जागा सांभाळण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमडदे येथे गेले होते. २७ रोजी रात्री उशिरा आमडदे येथुन मोटरसायकलने पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान अंकीत काॅटन जिनिंग जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील गोपाल पुजारी हे जागीच ठार झाले तर खुशाल सोनार हा गंभीर जखमी झाल्याने त्यास जळगांव येथे उपचारासाठी दाखल केले असता खुशाल सोनार याचा दि. २८ रोजी मृत्यू झाला. मयत गोपाल पुजारी यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी व एक बहिण तर खुशाल सोनार याचे पाश्चात्य आई, वडिल, बहिण असा परिवार असुन गोपाल पुजारी व खुशाल सोनार हे परिवारातील एकुलते एककर्ते असल्याने पुजारी व सोनार परिवारावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content