यावल पंचायत समिती उपसभापतीपदी योगेश भंगाळे यांची निवड

यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी योगश भंगाळे यांची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली. ही निवड पंचायत समितीच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील व महसुलचे दिपक भुतेकर यांची उपस्थिती होती. उपसभापती पदासाठी भाजपातर्फे योगेश दिलीप भंगाळे, काँग्रेसतर्फे कलीमा सायबु तडवी, सरफराज तडवी यांचे प्रत्येकी एक असे 2 असे  एकूण ३ नामर्निर्दशन अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज प्राप्त झाले होते. पं.स.सत्ताधारी भाजपाने चार तर काँग्रेसने चार असे सरसम्मान सदस्य संख्याबळ आहे. विद्यमान प्रभारी सभापती दिपक पाटील यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवड करण्यात आली.

यावल पंचायत समितीत योगेश भंगाळे, दिपक भास्कर पाटील, लक्ष्मीबाई विजय मोरे, पंचायत समितीच्या विधमान सभापती  पल्लवी पुरूजीत चौधरी असे चार सदस्य असुन कॉंग्रेस पक्षाचे उमाकांत रामराव पाटील, शेखर सोपान पाटील, सरफराज सिकंदर तडवी ,कलीमा सायबु तडवी हे सदस्य आहेत. या वेळी उपसभापतीच्या निवड प्रक्रीयेत पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी यांनी आपला उमेदवारीचे अर्ज मागे घेतल्याने दोन अर्ज राहीले असता मतदान घेण्यात आले योगेश भंगाळे यांना ४ मते तर कलीमा सायबु तडवी यांना ही चार मते मिळाल्याने सरसन्मान मते मिळाल्याने अखेर ईश्वरीय चिट्टीद्वारे प्रेम देवरे यांनी काढतेल्या चिठ्ठीद्वारे योगेश भंगाळे यांची निवड करण्यात आली . यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विविध पदधिकारी व कार्यकार्यांनी योगेश भंगाळे यांचे स्वागत केले .

Protected Content