व्यावसायिकास लुटणार्‍या तिसऱ्या संशयितास एलसीबीकडून अटक

जळगाव प्रतिनिधी । नटवर टॉकीज परिसरात बुट विक्रीचा व्यवसाय करणार्‍या बाबुलाल डिगांबर निंबोरे (वय-७१, हे बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) या परप्रांतीय व्यावसायिकाला लुटल्याच्या गुन्ह्यातील चार जणांविरोधात शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल आहे. यातील दोन जणांना यापूर्वी  २७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तर तिसऱ्या संशयित आरोपी  राहुल सुरेश आरके (वय-२४) रा. चौघुले प्लॉट या दाणाबाजारातून आज ८ मार्च रोजी अटक केली आहे. 

बाबुलाल डिगांबर निंबोरे वय ७१ हे शहरात बुट विक्री व्यवसायानिमित्ताने ते आले आहेत. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजकमल चौक येथे रिक्षाची प्रतिक्षा करत होते. रिक्षा आल्यानंतर ते त्यात बसले. रिक्षात चौघे जण बसलेले होते. त्यातील एकाने खाली उतरुन निंबोरे यांना इतरांच्या मधोमध बसविले. राजकमल चौक ते पांडे चौकादरम्यान रिक्षातील चौघांनी निंबोरे यांच्या खिशातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड व १ हजार १०० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळीजबरीने काढून घेतला व यानंतर निंबोरे यांना बी.जे. मार्केटसमोर झिपरु अण्णा समाधी जवळ रिक्षातून उतरवून दिले आणि चौघे पसार झाले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

गुन्ह्यात संशयितांनी वापर केलेल्या रिक्षाचा एम.एच.१९ व्ही. ६६८१ असे असल्याचे निष्पन्न झाले. या क्रमाकांवरुन संशयितांनी रिक्षासह रिक्षामालक ईश्‍वर संतोष भाई यास ताब्यात घेतले होते.. त्याने बंटी नंदू महाले रा. मयुर कॉलनी, अमोल ईश्‍वर भोसले, व राहूल आरके अशा तिघांसोबत गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी ईश्‍वर भोई यास अटक करुन गुन्हयात रिक्षा जप्त केली. त्याला एक मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी २७ फेब्रुवारी रात्री अमोल भोसले यास अटक केली होती. तर आज तिसरा संशयित आरोपी राहुल सुरेश आरके याला शहरातील दाणाबाजार परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तर चौथा बंटी महाले अद्याप फरार आहे. त्याचाही शोध सुरू आहे. 

Protected Content