थोरगव्हाण येथे शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष शोधमोहीमेला सुरूवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या वतीने गावातील व परिसरात शाळाबाह्य बालकांच्या विशेष शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

यावल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख  व केंद्रप्रमुख विजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन सर्व सदस्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या सर्वेक्षणात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवायची आहे. या शोध मोहिमेच्या मुख्य हेतू शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, तसेच पत्रक अ भरणे. या मोहिमेत अठरा वर्षे वयोगटापर्यंतची दिव्यांग बालकांचाही समावेश करण्यात येत आहे. योग्य प्रमाणात शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालके शाळेत वयानुरूप दाखल झाली आहे. अशा बालकांना विशेष प्रशिक्षणात सहभागी करून घेणे. कोरोना काळात अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले असून सहा ते अठरा वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य असतील अशा सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे व ही मोहीम १ ते १० मार्च २०२१ पर्यंत चालु राहणार आहे. वस्ती, वाडा, पाडा वीटभट्टी, ऊसतोड, गुऱ्हाळघर गावस्तरावर , संपूर्ण शहरात करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

या सर्वेक्षणातून गावातील काम करणाऱ्या पावरा समाजातील व्यक्तीचा शोध घेऊन तीन बालकांना शाळेत दाखल करण्यात आले. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवृत्ती चौधरी, घनश्याम झुरकाळे , विनोद पाटील ,विनोद भालेराव, गावाचे पोलीस पाटील चौधरी भाऊ , तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे व सहशिक्षक निलेश धर्मराज पाटील , एकनाथ सावकारे , निलेश पाटील या शिक्षकाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Protected Content