विद्यापीठ व बेंडाळे महाविद्यालयतर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात (व्हिडिओ) 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुलींची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये 700 तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मॅरेथॉनला हिरवी झेंडी आयएमआर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे बेंडाळे कॉलेजच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दाखवली. यावेळी जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे स्पोर्ट विभागाचे प्रमुख दिनेश पाटील, डॉ. अनिता कोल्हे ह्यांची उपस्थिती होती.

आझादी का अमृत मोहत्सव’ निमित्त पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय पासून तर आकाशवाणी चौक, डी-मार्ट ते आकाशवाणी चौक मार्ग परत डॉ. बेंडाळे महाविद्यालय असा रूट घेण्यात आला होता. ह्या स्पर्धेत मुलींमध्ये पाहिला क्रमांक सरला अस्वार हिने पटकावला, तर महिलांमध्ये अश्विनी काटोले ह्यांनी पहिला क्रमांक पटकावला.

मॅरेथॉन स्पर्घेत विजेते पहिल्या पाच मुली आणि महिलांना पारितोषिक देण्यात आली, जळगावच्या प्रथम नागरिक आलेल्या महापौर जयश्री महाजन, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण समितीचे संचालक डॉ सुनील कुलकर्णी , प्राचार्य शिल्पा बेंडाळे , प्राचार्या डॉ गौरी राणे ह्यांच्या प्रमुख उपस्थिती पारितोषिक देण्यात आली.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असल्याने ‘आझादी का अमृत मोहत्सव’ निमित्त खान्देशात पहिल्यांदाच एकाच वेळी 700 विद्यार्थिनी तसेच महिलांची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

विशेष म्हणजे यावेळी स्पर्धकांना पाण्याच्या बॉटल तसेच ज्यूस आणि लिंबू सरबतच्या बॉटल देण्यात आल्या ह्या बॉटल मुळे कचरा आणि परिसरात अस्वच्छता पसरू नये यासाठी महाविद्यालयातील स्पोर्ट विभाग, NSS आणि NCC च्या विद्यार्थिनींनी सर्व बॉटल आणि कचरा उचलून ऐका ठिकाणी जमा करून स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला.

मॅरेथॉन विजयी स्पर्धकांची नावे –

मुलींमध्ये पहिला क्रमांक सरला अस्वार हिने पटकावला, तर दुसरा क्रमांक पूनम साबणे तर तिसरा क्रमांक बायजा पावरा, चौथा क्रमांक जान्हवी रोझोदे, पाचवा क्रमांक वैशाली कोळी हिने पटकावला.

महिलांमध्ये

अश्विनी काटोले ह्यांनी पहिला क्रमांक तर दुसरा कविता पाटील, तिसरा क्रमांक महाविद्यालयातीलच कर्मचारी विद्या बेंडाळे, चौथा क्रमांक रती महाजन आणि पाचवा क्रमांक प्रिया पातोडे ह्यांनी पटकावला. ह्या मॅरेथॉन स्पर्धासाठी महाविद्यालयातील स्पोर्ट विभाग तसेच NCC, NSS विभाग तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Protected Content