निधी मंजूर असूनही यावलच्या बसस्थानकाचे नूतनीकरण रेंगाळले

यावल प्रतिनिधी । सक्षम अधिकारी नसल्यामुळे येथील बस स्थानकाला निधी मंजूर असूनही याचे काम रखडल्याची माहिती समोर आली आहे.

आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखल्या जाणार्‍या तालुक्याच्या शासकीय कार्यालयांना लागले रिक्तपदाचे ग्रहण अनेक कार्यालया मध्ये प्रभारी आधिकारी असल्याने शासकीय कामांचा खोळंबा नागरीकामध्ये शासन कारभारा मुळे कमालीची नाराजी पसरली आहे. मागील अनेक दिवसांपासुन यावल नगर परिषद घे मुख्याधिकारी पद रिक्त असुन, यावल शहरातील महत्वाची कामे होत नसल्याचे शहरवासीयांची ओरड आहे. यासोबत शेतकरी बांधवांच्या प्रश्‍नांशी निगडीत असलेल्या तालुका कृषी अधिकारी यांचे पद गेल्या अनेक दिवसापासुन रिक्त असल्याने आधीच दृष्काळी परिस्थितीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आपल्या कामांसाठी हेलपाटे खावे लागत आहे. यावल तालुक्यातील ८६ ग्राम पंचायती चे केन्द्रस्थान असलेली पंचायत समितीचे महत्वाचे गटविकास अधिकारीपद हे गेल्या काही दिवसापासुन रिक्त असल्याने अनेक भ्रष्ठाचाराचे प्रकार समोर येत असुन याच कार्यालया अंतर्गत येणारे शिक्षण विभाग देखील कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी नसल्याने देखील शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुका पशुवैधकीय अधिकारी यांचे देखील पद रिक्त आहे.

या सर्व गोंधळात यावल एस. टी. आगार कसे मागे राहणार ? येथे ही कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे गेल्या एक ते दीड वर्षापासुन यावल बसस्थानकाच्या नुतन इमारतीसाठी २ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. मात्र सक्षम आगारप्रमुख नसल्याने या कामाला सुरुवात होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. आता यावल तालुक्यातील एवढी ही महत्वाची पदांची जागा रिक्त असतांना तालुक्याचा विकास कधी व कसा होणार हा देखील एक प्रश्‍न आहे.

Add Comment

Protected Content