बस स्थानकावरून अडीच तोळ्याची पोत लंपास

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकावरून महिला प्रवाशाची अडीच तोळ्यांची पोत लंपास केल्याची घटना आज घडली आहे.

यावल येथील बस स्थानकावर अर्ध्या प्रवासात सवलती मुळे महिलांची वर्दळ वाढली असून, आज दुपारी यावल चाळीसगाव गाडी मध्ये चढताना एका महिलेची सुमारे १ लाख८० हजार रूपये किमतीची अडीच तोडे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे .दुपारी पावणेतीन वाजेला लागणारे यावल चाळीसगाव गाडीमध्ये एक प्रवासी महिला चढत असताना तिची अडीच तोळे सोन्याची पोत चोरट्याने लंपास केली

यावल बसस्थानकावरून ही गाडी चोपड्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली असतांना वडोदा गावा जवळ तिकीट काढण्यासाठी पैसे पाकिटातून काढण्याचे प्रयत्न करीत असतांना तेव्हा आपली पोत गायब झाल्याचे दिसुन आले. सदरचा प्रकार महिलेने वाहक यांना सांगितले असता एसटी बस यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली. मात्र यात काही निष्पन्न झाले नाही.

यावल पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांची संख्या ही कमी असल्याचे नेहमीच कारण असून बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रवाशी वर्गातुन व्यक्त होत आहे. वारंवार बसस्थानकाच्या परिसरात होणार्‍या चोर्‍यांच्या संदर्भात आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी वारंवार पोलीस ठाण्याला आदीच तक्रारीचे पत्र व्यवहार केलेला असून असे असतांना ही पोलीसांचा बंदोबस्त देण्यात येत नाही. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभाराने चोरट्यांना चांगलेच फावत असल्याचे संतप्त प्रतिक्रीया प्रवासांकडून व्यक्त होत आहे.

सध्या लग्नसोहळयांचे कार्य सुरू असल्याने मोठी प्रवासांची वर्दळ बसस्थानकावर दिसत असुन . याशिवाय शासनाने महिलांच्या अर्ध्या तिकिटाची सवलत महिलांना दिल्याने एसटीने प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी दिसुन येत आहे. यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यावल पोलीस ठाण्यातील संबंधितांनी या ठिकाणी त्वरित बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content