अमळनेर बाजार समिती सभापती व उपसभापती निवड बिनविरोध

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक आधार पाटील तर उपसभापतीपदी सुरेश पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पॅनलने अलीकडेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दणदणीत यश संपादन केले होते. यानंतर सभापती आणि उपसभापती पदांवर कुणाची वर्णी लागेल याबाबत उत्सुकता लागली होती.

या पार्श्‍वभूमिवर, आज सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत अमळनेर बाजार समिती सभापती पदी अशोक आधार पाटील तर उप सभापती सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून बाजार समितीवरील आजवरची भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात इतर कोणत्याही सदस्यांनी अर्ज दाखल केला नाही. यामुळे सभापतीपदी अशोक आधार पाटील व उपसभापतीपदी सुरेश पाटील यांची निवड बिनविरोध झाली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रतोद तथा आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार साहेबराव पाटीला यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या. निवड जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ढोल-ताशांच्या तालावर आमदार अनिल पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी ठेका धरला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content