भरधाव फॉर्च्युनरने दोघांना उडविले : तरूण गंभीर जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युरने दोन तरूणांना उडविले असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज भुसावळ शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. यात एमएच ०४ ईडी ०४४५ क्रमांकाची फॉर्च्युनर भरधाव वेगाने दीपनगरकडून जळगावकडे निघाली होती. यात दुचाकीवर असलेले गौतम वाघ ( वय ३०, रा. भुसावळ ) आणि इरफान शेख ( वय२५, रा. निंभोरा बुद्रुक ) हे दोन तरूण जखमी झाले. हा अपघात हॉटेल राधाकृष्णच्या जवळ घडला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची तयारी सुरू होती. तर, अपघातातील दोन्ही तरूणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Protected Content