जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळच्या मालधक्क्याजवळ गोदामाच्या समोर रात्री तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू झाला आहे.
शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याच्या समोर रात्री उशीरा एका तरूणाचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरूणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास करून संबंधीत तरूणाची ओळख पटविली. यातून मयत तरूण अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी या तरूणाच्या कुटुंबियांना पहाटे अडीच वाजता याबाबतची माहिती दिली.
या संदर्भात मयत तरूणाचे वडील गणेश रमेश गायकवाड यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, आपण राजमालती नगर जळगाव येथे पत्नी सारीका आणि दोन मुले अनुक्रमे अनिकेत (मयत), विशाल यांच्यासह राहतो. आपण सुरत रेल्वे गेटजवळ येथील माल धक्यावर हमाली काम करतो. Live Trends News तसेच माझे मुले मिस्तरी काम करतात. काल दिनांक २४/०५/२०२२ रोजी मी रात्री साडेआठच्या सुमारास कामावरुन घरी आलो. त्यावेळी अनिकेत हा घरी नव्हता, मुलगा अनिकेत हा नेहमी घराबाहेर असायचा व केव्हाही घरी यायचा.म्हणुन मी त्याची वाट न पाहता जेवण करुन झोपुन गेलो रात्री अडीच वाजेच्या सुमारास आमच्या गल्लीतील अर्जुन धोबी हे पोलिसांसह आले. त्यांनी पिप्राळा रेल्वे गेटजवळ माल धक्कयाचे गोडावुन समोर एक मृतदेह आढळला असून सदरच्या प्रेताचा चेहरा तुमचा मुलगा अनिकेत याच्या सारखा असल्याचे आम्हाला समजले आहे. यानुसार खातरजमा करण्यासाठी पोलीस त्यांना घटनास्थळी घेऊन गेले.
यात पुढे म्हटले आहे की, पिंप्राळा रेल्वे गेटजवळील माल धक्याजवळ गोडावुनचे बाहेर एक प्रेत पडलेले होते. या मृतदेहाच्या डोक्याचा भाग पुर्णपणे चेंदामेंदा झालेला होता. त्याचे बाजुला रक्ताने भरलेला मोठा दगड पडलेला होता.सदर प्रेताचा चेहरा ओळखु येत नव्हता तेव्हा सदर प्रेतांचे अंगावरील कपड्यावरुन व त्याचे हातातील कड्यावरुन व पायातील काळ्या रंगाचा दोर्यावरुन सदर पार्थिव हे माझा मुलगा अनिकेत यांचे असल्याचे दिसून आले. माझा मुलगा अनिकेत यांचा कोणीतरी त्याचे डोके दगडाने ठेचुन त्यास जिवे ठार मारले. दिनांक २५/०५/२०२२ रोजी रात्री ०१.३० वाजे पुर्वी जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील माल धक्क्याचे गोडावुन समोर माझा मुलगा अनिकेत गणेश गायकवाड यांचा कोणीतरी त्याचे डोके दगडाने ठेचुन खुन केला आहे म्हणुन माझी अज्ञात आरोपीतांन विरुध्द कायदेशिर फिर्याद देत असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात अज्ञात मारेकर्यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.