मध्यरात्री रेशनचा झोल उघड : काळ्या बाजारात जाणार्‍या धान्याचे वाहन रंगेहात पकडले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड येथील रेशन दुकानाचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असतांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी आता होत आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मारवड गावात काल मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांनी रेशनचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. मारवड येथील विकास सोसायटीचे रेशन दुकान क्रमांक १०५ व १०६ येथील दुकानातून काळ्या बाजारात विक्रीसाठी धान्य घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी याचे वाहन पकडले.

दरम्यान, माल काळ्या बाजारात जात असताना येथील ग्रामस्थांनी गाडीत माल भरत पकडले त्यातील स्थानिक कर्मचारी याने कुलूप लावून पळ काढला मात्र गाडी मालक व तांदुळाच्या गोण्या व वजन काटा रंगेहात पकडला. सेल्समनच्या सांगण्यावरून हे होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनतर ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल वाघ यांना माहिती लगेच फोनवर कळविले त्यानी रात्री ११ वाजेच्या सुमारास तालुका पुरवठा अधिकारी बावणे; गोडवूनचे अनिल पाटील व मारवड तलाठी भावसार यांना पाठवून दिले. त्यांनी रेशन दुकान सील केले असून काळ्या बाजारात जाणारा मालाची गाडी मारवड पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पुढील कार्यवाही पंचनामा करून करण्यात येणार आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. सदरचे रेशन दुकान हे सोसायटीचे असून संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत होते का यावर नजर ठेवली जात नाही होती का ? असे प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. एवढा भ्रष्ट प्रकार घडूनही मोजकेच संचालक रात्री याठिकाणी आले बाकी संचालकांनी येणे का टाळले यावरूननही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे रेशन दुकानाचे सेल्समन यांना महसुलाच्या अधिकार्‍यांनी सम्पर्क केला असता त्यांनी मोबाईल कॉल रिसिव्ह करीत नाही असे बावणे यांनी सांगितले. यावर संचालक मंडळ काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मारवड येथील ग्रामस्थ रवींद्र पाटील महेंद्र पाटील जितेंद्र पाटील यांनी ही गाडी पकडून दिली. त्यांनतर त्याठिकाणी रात्री १ वाजेपर्यंत शेकडो ग्रामस्थांची गर्दी झाली होती. महेश पाटील, रावसाहेब पाटील, गणेश पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, उमेश सुर्वे आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते

Protected Content